शशांक - लेख उशीरा वाचला. छान जमला आहे. कल्पना खूपच आवडली.
-----------------------------------------------
अचानक पुस्तकवाचक, साहित्यप्रसारक आणि रसिक मंडळाची ही कलोपासना आदरास पात्र आहे. साहित्याच्या इतिहासात अचानक पुस्तकवाचक, साहित्यप्रसारक आणि रसिक मंडळाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
तरीही काही जातिवंत (म्हणजे माझ्यासकट बऱ्याचजणांचा पत्ता कट!) मनोगतींनी व्यक्त केलेली खंत तेव्हढी तुमच्यापर्यंत पोहचविणे हे माझे कर्तव्यच आहे -
सदर लेखाची प्रेरणा मनोगत हीच आहे. त्यामुळे तशी कृतज्ञता/श्रेय/संदर्भ देण्याचा विशालपणा मंडळाकडून अपेक्षित होता. त्याच्या अभावाने आपल्या पराक्रम(?)सूर्यास उचलेगिरीचे खग्रास ग्रहण लागले आहे. (नसेल तर ते लावण्यास मनोगतावरील राहू-केतू (कोण ते विचारू नका!!) समर्थ आहेतच.