टग्या,
आपण दिलेली ही कथा 'बालकथा' या वर्गात वर्गीकृत होऊ शकत नाही, हे नमूद करावेसे वाटते. असो.
कथेतून तात्पर्य काढायचे सांगितले असल्याने मी माझ्या कुवतीनुसार काढलेली तात्पर्ये पुढीलप्रमाणे ( अजून शोधायला गेल्यास अजून सापडतील, हे सांगणे न लगे ! ) :
१. कल्पवृक्षाखाली बसायची संधी मिळाली तरी उच्च विचार करून प्राप्त संधीचा योग्य उपयोग करून घ्यायची बुद्धी त्या व्यक्तीकडे असेलच असे नाही.
२. खूप जबरदस्त काम करण्याची पात्रता असूनही नोकरीसाठी एकाच व्यक्तीला/संस्थेला - जिने करीयरच्या सुरूवातीच्या काळात एक छान ब्रेक दिलेला असला तरी दूरगामी विचार करता जी व्यक्ती/संस्था त्या व्यक्तीच्या गुणांचा योग्य वापर करून घ्यायला सक्षम नाही, प्रामाणिक राहून चिकटून राहायचा प्रयत्न केल्यास 'सांगकाम्या' एवढीच भूमिका निभावता येणे शक्य असते. त्याहून जास्त अपेक्षा न ठेवणेच उत्तम !
मला जर असा राक्षस भेटला असता तर मी त्याला,"तुला नेहमी कुठल्या ना कुठल्या गुलामीतच रहावं लागेल असे वर तू इतरांना का देतोस?" हा प्रश्न विचारून त्याचे उत्तर शोधायला सांगेन.
या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने खरंच स्वतःच्या वागण्याचा विचार केला आणि बाटलीतल्या कैदेतून सुटका होऊनही परत वेगळ्या गुलामीत अडकायला स्वतःच निमंत्रण देऊन फसलो आहोत असे मान्य केले तर "जा तू तुझ्या पद्धतीने जीवन जगून दाखव." सांगेन.
प्राप्त परिस्थितीत खुश आहे असे त्याने त्याच्या उत्तरातून सांगितल्यास मी त्याला आणखीन एकही काम सांगणार नाही, जेणेकरून माझ्या मते असलेल्या माझ्या कैदेतून तो सुटेल आणि अनपेक्षितपणे आयुष्यात येऊन उभ्या राहिलेल्या एक प्रकारच्या कैदेतून मीही !