खूप उशीरा प्रतिसाद देत आहे. कारण जवळजवळ महिन्याभराने मी मनोगतावर आले आहे.

लेख वाचून तलतच्या गाण्यांची मनात उजळणी झाली आणि फार आनंद झाला.
सीनेमें सुलगते... हे तर अप्रतिम द्वंद्वगीत आहे. शब्दही सुंदर! "दो चार कदम जब मंजिल थी, किस्मतने ठोकर खायी है।" !!

तुमच्या यादीतील बरीचशी आणि टग्या यांच्या यादीतीलही बरीच गाणी मला आवडतात. त्याशिवाय मला खूप आवडणारी आणखी काही गाणी - ऐ गमे दिल क्या करूं (मजाजचे शब्द..
रास्तेमें रुकके दम लूं ये मेरी आदत नहीं
लौटकर वापस चला जाऊ मेरी फितरत नहीं
और कई हमनवा मिल जाये ये किस्मत नहीं
ऐ गमे दिल क्या करूं )
हे तर तलतशिवाय दुसऱ्या कुणाच्या आवाजात ऐकण्याची कल्पनाच करता येत नाही. तसेच- ऐ प्यार तेरा शुक्रिया. 
                           
एक गैरफिल्मी गाणे - तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी । हे त्याने बहुधा करिअरच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे.

लेख वाचताना आनंद मिळाला, प्रतिसाद लिहितानाही मिळाला.  

सन्जोप राव धन्यवाद 

मीरा