जयन्ता,
यात मी आपल्याल दुखवण्याचा प्रश्नच कुठे येतो? आपण माझ्या प्लॅस्टिकची कविता वर पाठवलेल्या सूचनांचे (इंग्रजी शब्द न वापरण्याबद्दल) मी स्वागतच केले आहे की. पुढे या विषयाचे `व्यवहारात मराठी शब्द वापरावेत' असे विषयांतर होत गेले. मराठी शब्द व्यवहारात किती वापरावेत किंवा त्यांचा किती अट्टाहास करावा याला मर्यादा असतातच. आता पेनल्टी या विषयावरील चर्चेत मूळ इंग्रजी शब्दांना अगदी मनोगतवरही प्रतिशब्द वापरणे काहिसे अव्यवहार्य होते असे नाही का वाटत? आपली सूचना वाचूनच मनोगत वर हा प्रयोग करून पाहिला.
जयन्ता भाषा अशी सहजा सहजी मरत नसते. तिच्यात बदल होत होत भाषेचे फ्लेवर्स तयार होतात. ज्ञानेश्वरांच्या वेळची, शिवाजी महाराजांच्या वेळची, ब्रिटिशकालीन मराठी आणि आताची मराठी यात फरक आहेच की. मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे. याशिवाय अरबी, फार्सी भाषेतील शब्द ही मराठीत बेमालूमपणे मिसळून गेले आहेत. वर्डस्वर्थ आणि बायरन यांची इंग्रजी आणि आताची इंग्रजी यातही फरक आहेच ना? इंगजीतही शेकडो हिंदी शब्द स्वीकारले गेले आहेत.
मराठीला धोका असलाच तर तो आहे हिंदीकडून कारण मुंबई सारख्या शहरात दोन अपरिचित मराठीही सुरूवात हिंदीतून करतात. अमराठी तर हिंदीच वापरतात.
जयन्ता आपला नामोल्लेख केल्याबद्दल क्षमस्व. अशा संदर्भांचे उल्लेख मनोगतवर अनेकदा आले आहेत. कृपया टोकाची भूमिका घेऊ नये ही विनंती.
मनोगतींनो चर्चा भलत्याच वळणावर गेल्याबद्दल माफी असावी.