मीरादेवी, मी तेच विचारतो आहे, की मूळ कवितेच्या कुठल्या गुणाचे/अवगुणाचे हे विडंबन आहे? की मूळ कवितेच्या आकृतीबंधाला हास्यास्पद ठरविण्याचा हा प्रयत्न आहे. वस्तुतः विडंबन ह्या सदरात जर ही कविता लिहीली नसती तर त्या संदर्भात केलेले नवे लिखाण म्हणून कविता निराळ्या संदर्भात अर्थपूर्ण ठरली असती. (खरे तर तशीच ती असल्याचे इतरांच्या प्रतिसादावरून सहज समजते.) मात्र त्या कवितेचे विडंबन म्हटल्या गेल्यामुळे मूळ कवितेचा उपहास, विडंबन, खिल्ली असे तिचे प्रयोजन वाटू लागते. त्यामुळे मूळ लेखिकेवर अन्याय होतो.

ह्यासंदर्भात मला तुमची विडंबनाची व्याख्या जाणून घेणे आवडेल.
सातीनेही तशी व्याख्या करून पाहावी.