प्रश्न आणि उत्तर दोन्ही झकास ! उत्तरात सांगितलेला मुद्दा वीजेसारखा डोक्यात चमकून गेला होता खरा पण गजराच्या घड्याळांचा विचार न केल्याने उत्तररुपी पाऊस पाडू शकला नाही. :-(
दुकानातील सगळी घड्याळे एकच वेळ दाखवण्यासाठी घड्याळजीने सज्ज केली तर दुकानात शिरलेल्या ग्राहकाला 'फेज डिफरन्स' चे महत्त्व कळून येईल. ढोबळपणे वेळ एकच असूनही सेकंद काट्याच्या हलण्याची वेळ प्रत्येक घड्याळात वेगवेगळी असल्याने प्रत्येक घड्याळाच्या सेकंद काट्याचे एक झकास समूहनृत्य बघायला मिळू शकेल ! गजराची घड्याळेही उपस्थित असल्यास या समूहनृत्याला काट्याच्या हालचालीच्या आवाजाबरोबरच ( तसा होत असल्यास ) धडाकेबाज संगीताचाही साज चढेल ! ही करमणूक (!) दर तासाला नवानवाच उच्चांक गाठेल !!! तीही नृत्यात दंग घड्याळांचा नृत्य करण्याचा ( फेज डिफरन्समुळे चढलेला ) नशा (!) वाढल्याने समूहनृत्यात आधीआधी छोट्या असलेल्या पदन्यासातल्या चुका वाढत जाण्यास सुरूवात होईल आणि यामुळेच की काय संगीताचाही आनंद जास्तीतजस्त काळ अनुभवण्याचा घड्याळजी आणि ग्राहकांना आनंद उपभोगता येईल. हाहाहा...