साती नमस्कार,
गोळेकाका काही गोष्टी हलकेच घ्यायच्या असतात हो , प्रत्येकवेळी इतकं गंभीर होऊन कसं चालेल?
खरे आहे. ही कविता विडंबन ह्या सदरात नसती तर माझा प्रतिसाद एवढा अवघडला नसता. मला तुमची स्वतःची 'विडंबन' म्हणजे काय? ह्याबाबतीतील मते जाणून घ्यायला आवडतील.
बाकी थोड्या दिवसांनी नरेंद्र काकांच्या सातीवरील/ सातीसाठी कविता असं एखादं पुस्तक प्रसिद्ध होऊ शकेल.
अशा कविता नको आहेत हे कळले. तथास्तू.
'विडंबन करताना मूळ कवितेतील दोषांचं करायचं असतं' हा शोध नव्याने लागला. आता प्रेरणादेवींच्या कवितेतच मुळात काही दोष मला वाटला नसेल तर त्यांचं विडंबन कुठून करणार मी?
मग हे विडंबन आहे तरी कशाचे? आकृतीबंधाचे?
'कवळी कवेत' ह्या शब्दांखेरीज ह्या कवितेचा तिच्याशी काही संबंध दिसत नाही. 'कवळी कवेत' हे शब्द वापरून केलेली नवी कविता ठीक आहे.
हे मात्र चूक हो, सगळ्या द्विपदी (शेवटची सोडून ) मूळ कवितेतील बरेचसे शब्द वापरून केल्या आहेत.
ह्यावरून विडंबन आकृतीबंधाचेच असल्याचे दिसते. तोही मुळीच हास्यास्पद नाही. तुमच्या कवितेतील विनोद निर्मितीचे मुद्दे मूळ कवितेशी संबद्ध नाहीत. त्यांचा संबंध तात्यांच्या मूळ कवितेवरील प्रतिसादाशी आहे. ह्या कवितेला स्वतंत्र कविता म्हणा एवढेच माझे म्हणणे आहे. त्यामुळे मूळ लेखिकेला दूषण लागणार नाही. (सदरहू लेखिकेला मुळीच भान नसावे असे दिसते.) हे माझे मत आहे.