अनुच्या प्रश्नाचे उत्तर थोडेसे तांत्रिक आहे. जी ई किंवा जेनेटिक इंजीनिअरिंग तंत्रज्ञानाचा वापर मोन्सॅन्टोसारख्या कंपन्या फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतात. मोन्सॅन्टोला म्हणूनच 'म्यूटान्टो' किंवा 'मोनसॅटान' असे म्हणून खिजवले जाते. मोन्सॅन्टोच्या एका प्रवक्त्याने परवा ' आम्हाला फक्त नवीन बियाणे विकण्यात आणि नफा मिळवण्यात रस आहे, शेतकऱ्यांच्या हिताशी आम्हाला काही देणे-घेणे नाही' असे सांगून एका वादाला तोंड फोडले होते. पैसा आणि ताकद - मनी अँड मसल - या जोरावर विकसनशील देशांत जास्तीत जास्त धंदा करायचा हेच या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे धोरण आहे. (ज्याला इंग्रजीत 'बुलडोझिंग' असे म्हणतात). त्यामुळे कंपनीला अडचणीत आणणारी माहिती लपवून ठेऊन अशी तडजोड करणे अगदीच शक्य आहे.