थोडे विषयांतर होते आहे त्याबद्दल क्षमस्व.
मी धार्मिक नाही, पण मला रामायणापेक्षा महाभारत जास्त भावते. माझ्या मते रामायण आदर्श समाजाचे चित्रिकरण आहे. त्यात काळे किंवा पांढरे या दोनच छटा आहेत.
याउलट महाभारतामधे वास्तविकता आहे.
माझ्या मते कृष्ण हा आदर्श आहे. (कृपया गैरसमज नको. याचा अर्थ सर्वांनी १६००० बायका कराव्यात असा अजिबात नाही.) महाभारतामधे अनेक वेळा अत्यंत अवघड प्रसंगामधे कृष्णाचा प्रतिसाद प्रसंगानुरुप होता. मग ते कृष्णशिष्टाई करणे असो कि
सीदन्ति मम गात्राणि म्हणणाऱ्या अर्जुनाला योग्य दिशा दाखवणे असो. (मला वाटते गीता हा मानवी इतिहासातील पहिला सायकोथेरेपीचा दाखला असावा. मानसोपचारतज्ञ
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी रोजच्या जीवनात गीता कशी आचरावी यावर एक सुंदर
पुस्तक लिहिले आहे.)
रोजच्या जीवनामधे इम्पॅक्टिकल आदर्श ठेउन जगणे शक्य नसते. प्रत्येक क्षणी आपला विवेक जागा ठेवून योग्य तो निर्णय घ्यायला पाहीजे.