मजा आली !

 मला वाटतं "ओळख" लेखाच्या निमित्ताने इथे आलेल्या प्रत्येक मनोगतीने एकमेकांना कसे ओळखले ते लिहावे. म्हणजे--

 या संमेलनात औपचारिक ओळख परेड न होता एखाद्याच्या/एखादीच्या लिखाणावरून किंवा मनोगती नावावरून तो मनोगती कसा/ कशी दिसत असेल असे अंदाज बांधण्याचा खेळ खेळण्यात आला. काही मनोगतींच्या डोक्यावर शिंगांच्या ऐवजी टक्कल बघून सातीचे बरेच अंदाज चुकले. काही खाण्यावर प्रेम करणारे लोक मात्र अपेक्षेप्रमाणे गरगरीतच होते. सर्वसाक्षींना सर्व पाहण्यासाठी अपेक्षेप्रमाणेच मोठा चष्मा होता, वात्रट टग्या इ. मंडळी अनपेक्षितरित्या सभ्य दिसत होती.

                                  साती काळे.