सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद!

काका - तुम्ही सुचविलेला शेवट कदाचित सगळ्यात चपखल बसणारा शेवट आहे.

अंजू - 'अजून लिहित रहा' हे प्रोत्साहन आवडलं.  लवकर लवकर पुढचे भाग टाकू शकलो कारण कथा हस्तलिखित स्वरूपात तयार होती.  साप्ताहिक सकाळनं ही कथा २४डिसेंबरच्या अंकात छापली होती.

 मृदुला - 'तरी अजून सफाई आणता येईल' या सल्ल्याबद्दल धन्यवाद.  या सल्ल्याचा पुढच्या लिखाणासाठी नक्की उपयोग होईल.

शैलेश / प्रियाली - शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

मैथिली / विश्वमोहिनी - शेवटाचा विचार करून अनिखिंडींची व्यक्तिरेखा मुद्दामच मी जास्त सखोल रंगवली नव्हती.  आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

अनु - कथेचा शेवट करुण आहे हे मान्य पण व्यावहारिकता किती निष्ठुर असू शकते हे यातून दाखवायचा प्रयत्न होता.

संजोप - आपल्या बहुमूल्य आणि तांत्रिक सल्ल्याबद्दल मनापासून धन्यवाद! आपल्या मुद्द्याच्या पुष्टीकरणार्थ आणखी असंही की कथेसाठी म्हणून कल्पना विस्तार जसा झाला तसं लिहिलंय त्यामुळे थोडी अतिशयोक्ती झाली आहे पण वास्तवातही टर्मिनेटर सीडस अगदी विषारी नाही तरी माणसाच्या शरीरावर दुष्परिणाम करतात.  ग्रीनपीस सारख्या संघटना याविरोधात मोठा लढा देत आहेत.

पुन्हा एकदा सगळ्यांनाच धन्यवाद!

- मिलिंद