सुटलाय लाडवांचा हा घमघमाट सारा
कवळे! कुठे सखे तू? मी शोधतो बिचारा ॥

उल्हास दशदिशांना घर गोड गोड झाले
जबड्यांस सोडूनिया पण हाय दात गेले ॥

नाकात चोंदलेल्या घेतो हिमेश ताना
माझे  नशीब! बहिऱ्या ऐकू न येई काना

त्या टंच अप्सरांचे टीव्हीवरी नजारे
मी फक्त हळहळावे मज मोतीबिंदू का रे ॥

गात्रे असोत शिणली, हृदयी उधाण आहे
मी एक सत्तरीचा मी बाका जवान आहे