सहमत.
तरी श्रीकृष्णाच्या १६००० बायका होत्या असे बदनामीकारक उल्लेख उगीच घुसडले गेले आहेत. माना मानव वा परमेश्वर या गाण्यात १६००० बायकांना त्याने का वरले याचे कारण दिले गेले आहे. तो काही या सर्व बायकांबरोबर रत नव्हता. आम्ही श्रीकृष्णाच्या चारित्र्यातून जिथे फक्त मज्जा करता येईल तेवढेच उचलले आहे. उदा. दहीहंडी फोडणे आणि टिप-या खेळणे . याचेच पुढे विकृत रूप झाले आहे डिस्को दांडिया. कृष्णासारखा उत्तम राजकारणी नाही. असा राजकारणी देशाला मिळाल्यास काय बिशाद आहे अन्य देशांची आपल्याकडे वटारून बघण्याची?
गीताः गीते मध्ये सांगितले की आत्मा अमर आहे आनि शरीर नश्वर. पुन्हा दुसरा देह मिळतो इत्यादि. माझा विश्वास नाही. पण एवढे तत्वज्ञान कोळून पिऊनही त्याचा व्यावहारिक उपयोग कितीसा केला जातो? आज देशात १ कोटीहून अधिक अंध आहेत. त्यापैकी ४० लाख अंधांना मरणोत्तर नेत्रदानातून दृष्टी मिळू शकते. गरज आहे फक्त २० लाख लोकांनी नेत्रदान करण्याची. पण वर्षाकाठी फक्त १० हजार जण नेत्रदान करतात. जो देह जळून /पुरून नष्ट होणार आहे त्या देहाचा एवढा मोह? पुढील जन्मी आंधळे जन्मू ही देखील एक गैरसमजूत समाजात आहे. श्रीलंकेसारख्या लहानशा देशातून नेत्र येतात. पण हा १ अब्जाचा देश स्वतःच्या देशातील अंधांना दृष्टि देऊ शकत नाही.
या कामी गीता उपयोगी पडायला हवी.