मागील गझलेनंतर अपेक्षा वाढल्या होत्या. पण ही गझल ठीकठीक. ओघवतेपणा कमीच.
दिवे,चंद्र,तारे अता मालवू दे
नव्या जीवनाची निशा ज़ागवू दे
नव्या जीवनाची निशा जागवू दे ही ओळ वरच्या ओळीला नीट झेलत नाही. 'जीवनाची निशा' थोडीशी भरतीची वाटते. नव्याने सखे ही निशा जागवू दे वगैरे अधिक बरी झाली असती.

कशी रंगते संगती मी तुझ्या ते
पुन्हा, वेगळे रंगुनी, दाखवू दे

ओघवतेपणा कसा नाही ह्याचे उदाहरण.
तुझ्या संगतीने किती रंगते मी असा शब्दक्रम अधिक प्रवाही वाटतो. खालची ओळ काही खास नाही.

गळाभेट घेते तुझ्या लोचनांची
मिठीनेच त्यांच्या मला लाज़वू दे
ह्या ओळींत लाजवू दे म्हटले तर  मिठीनेच त्यांना मला लाजवू दे असे हवे असे वाटते. अन्यथा मला लाजू दे योग्य.

कल्पना ओढल्या-ताणल्यासारख्या  आहेत. उदा.
उरावे किती अन् कसे हे बहाणे?!
विसरण्या स्वतःला तयां आठवू दे

विचारगुरुत्व महत्त्वाचे असल्या ओढाताण समजू शकतो, रचनेतला ओबढधोबडपणाही चालून जातो. पण इथे विचारगुरुत्वही दिसत नाही.

असो. तूर्तास एवढेच.