»  |  |
फ़ार पुर्वीपासून हा वादाचा मुद्दा आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांची ना इकडची ना तिकडची अवस्था पाहुन मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घालायचे ठरवले होते. पण जवळ्पास चांगली मराठी शाळा नसल्याने तीला नर्सरी ते पहिली इंग्रजी शाळेत जावे लागले. पहिलीतच माझ्या लक्षात आले तीच्यापूढील अडचणींचे डोंगर. माझ्या सासरी विरोध असूनही मी तीला दुसरीपासुन मराठीला घातले. तीला वाचनाची आवड मराठीत गेल्यावरच लागली. आता ती ४थीत आहे, मी तिच्याशी मुद्दाम इंग्रजीत बोलते, ती टिवी वर इंग्रजी चित्रपट पाहते. घरातील सगळेजण तिच्या प्रगतीचे कौतुक करतात, पण स्वत:च्या मुलांना मात्र इंग्रजीत घालतात. घराबाहेर मराठीतून मुल्गी शिकते हे ऐकल्यावर मला वेड तर लागले नाही ना अश्या नजरेने सगळेजण पाहतात. दर वेळेस मला मात्रुभाषेतुन शिकण्याचे फ़ायदे समजवावे लागतात. तिला मी घरीच इंग्रजी शिकवते हे ऐकुन आम्हाला एवढा वेळ मिळत नाही हे कारण बहुतेक जण सांगतात पण टिवीवरील फ़ालतु मालिकांसाठी मात्र वेळ काढतात.
मी आणि मुलगी दोघीही मात्र सुखी आहोत. घरच्या अभ्यासात तिला मदत फ़क्त शाळेत समजले नसले तरच लागते, शिकवणी ची गरज अजुन भासली नाही, ( इंग्रजीत पहिलीपासुन शिकवणीला पाठवावे लागते - कारण तेच पालकांना वेळ नाही). तो वेळ ती अभ्यासाव्यतिरीक्त दुसर्या गोष्टी करण्यात सार्थकी लावते. लोकांना माध्यमाचे महत्व कळते पण मराठीला वाचवायची जबाबदारी त्यांच्या डोक्यावर नको, ते काम इतरांनी करावे असे त्यांना वाटते.
दुसरी एक पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन मराठी माणसे कामानिमीत्त एकत्र आली तर अजीबात मराठी बोलत नाही. समोरचा मराठी असेल तर मी मुद्दाम मराठीतून सुरूवात करते, आणि जर तो धंदेवाला असेल म्हणजे भाजीवाला वगेरे तर मराठी नसला तरी मराठीत सुरूवात करते आणि मग बहुतेक समोरचा ही मराठीतून सुरूवात करतो.
मला वाटते मराठी बोलणे चालणे म्हणजे काहीतरी भयंकर कमीपणाचे लक्षण आहे असा बहूतेक मराठी बांधवांचा समज झालेला आहे, मराठीचे मरण ओढवलेच तर ते ह्या समजातूनच ओढवेल.