विडंबन हे मूळ कवितेच्या गुणाचे/अवगुणाचेच असले पाहिजे, असा नियम नाही. किंबहुना, विडंबनात केवळ मूळ कवितेची रचना/शब्द घेऊन, त्यात थोडा फेरफार/मोडतोड/मोडजोड करून, त्याचा उपयोग सद्यस्थितीतील कशावर तरी टीका करण्यासाठी / सद्यस्थितीतील कशाची तरी खिल्ली उडवण्यासाठी केला जातो. मूळ रचना ही केवळ आधार म्हणून असते; मूळ रचनेची खिल्ली असावीच लागते, असे नाही, किंबहुना बहुधा नसते.

पुस्तकी उदाहरणच घ्यायचे झाल्यास, केशवकुमारांचे "आम्ही कोण" हे केशवसुतांच्या "आम्ही कोण"चे विडंबन, केशवसुतांच्या मूळ कवितेवर टीका/खिल्ली म्हणून नव्हते. (नक्की माहीत नाही, पण रविकिरणमंडळाची उडवलेली ती टर होती, असे ऐकलेले आहे.)

- टग्या.