सुधारीत आवृत्ती सहीच आहे. शेवटी कवी ते कवी आणि साती ती साती.

नाकात चोंदलेल्या घेतो हिमेश ताना
माझे  नशीब! बहिऱ्या ऐकू न येई काना
गात्रे असोत शिणली, हृदयी उधाण आहे
मी एक सत्तरीचा  बाका जवान आहे

दोन्ही द्विपदी खूपच आवडल्या. खास करून "उधाण".

टगोबा, ' माझ्या कविता कोणत्याही सकारात्मक बदलांसाठी सर्वांना खुल्या आहेत म्हणजे काय ?'  या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अशी अपेक्षा.

चित्त, धन्यवाद. आता यानिमित्ताने गझलेची बाराखडी च्या धर्तीवर 'विडंबनाची बाराखडी ' लिहिता येते का बघा. आमच्या सारख्यांना मार्गदर्शक ठरेलच पण संदर्भ म्हणूनही देता येईल.

                                                                साती