'निषेध, निषेध...'
'गप्प बसा...'
'हा साला ब्राम्हणविरोधी आहे...'
'चंद्रकांत ब्रिगेडचा हस्तक आहे..'
'तू ब्राम्हणविरोधी, तुझा बाप ब्राम्हणविरोधी...'
'श्शूऽऽऽऽ'
'हाणा साल्याला...'
'पाकिस्तान मुर्दाबाद....'
'बोलू द्या त्याला..'
'अबे चूप..'
'शडाप..'
'यू शडाप..'
आता हे कुठून आले मध्ये? :-)
पण अशा प्रसंगी हे येतेच, आणणारा एखादा तरी दीडशहाणा निघतोच, हे मात्र खरे!
असाच एक अनुभव आहे, स्थळ: अटलांटा, काळ: १९९६, निमित्त: अटलांटा ऑलिंपिक्स, भारत-पाक हॉकी सामना.
स्टेडियम खच्चून भरलेले, अर्थातच बहुतांशी भारतीय आणि पाकिस्तानी प्रेक्षकांनी - बरेचसे विद्यार्थी, पण काही आमच्यासारखे नोकरीवालेही. आमचा नोकरीतल्या दहापंधरा जणांचा कंपू सामना पहायला गेलेला. आम्ही लेटलतीफ, शेवटच्या क्षणापर्यंत जावे की न जावे या संभ्रमात (कवितेइतकेच हॉकीतलेही कळत असल्यामुळे), पण भारत-पाकिस्तान सामना आहे, तोही ऑलिंपिक्समध्ये, तोही अटलांटात, तेव्हा आरडाओरडा करायला का होईना, गेलेच पाहिजे असे आयत्या वेळी ठरवून तिकिटांच्या शोधात. त्यात कंपूतल्या एकाच्या गरोदर पत्नीने आयत्या वेळी न येण्याचा निर्णय घेतल्याने तिचे तिकीट 'फेस व्हॅल्यू'ला मिळाल्यामुळे आम्ही खूश! सामना भारत-पाकिस्तानचा असल्याने अर्थातच अटीतटीचा, आणि प्रेक्षकांतील वातावरण युद्धाचे. त्यात भारताच्या झेंड्याचे टीशर्ट रंगवून, तोंडाला तिरंग्याचे रंग फासून आमचे टोळके सर्व तयारीनिशी सज्ज होते. (पाकिस्तानी प्रेक्षकही हिरवे टीशर्ट वगैरे घालून अशाच तयारीत होते.) मागच्यापुढच्या रांगांत, आजूबाजूला बरेच पाकिस्तानी. सामना रंगात आलेला, आणि प्रेक्षकांच्या आरडाओरडीची चढाओढही.
मध्येच आमच्या एका मित्राला काय उपरती झाली, कोण जाणे - अचानक एका 'हाय-टेन्शन' क्षणाला एकदम उठून उभा राहिला, आणि जोराने ओरडला, "पाऽऽऽऽऽऽकिस्ताऽऽऽऽऽन मुर्दाऽऽऽऽऽबाऽऽऽऽऽऽद!"
शर्टाला खेचून खाली बसवावा लागला त्याला! (नशीब आमचे, आमच्या आजूबाजूच्या रांगांतल्या पाकिस्तान्यांनी सबुरीने घेतले, म्हणून!)
- टग्या.