साधनाताई,
मी तुमचे मनापासुन अभिनंदन करतो. कारण असे निर्णय घेण्यासाठी लोकोत्तर धाडस लागते हे खरेच.
अनेक वेळेस इग्रंजी माध्यम चांगले कि मराठी चांगले अशी चर्चा होते. पण हा प्रश्न न्याय आणि हक्काचा आहे असे मी मानतो.
सर्वच पातळीवर मराठीची जी अगम्य उपेक्षा चालु आहे त्याला अटकाव कसा करायचा हा मुळ मुद्दा आहे.
आता शाळकरी मुलांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल. त्यामधे आपण काही काम करु शकलो तर बरेच राहील असे मला वाटते. त्या साठी वर्तमानपत्रातुन प्रसिध्दी, पालंकाच्या गाठीभेटी, इंग्रजी माध्यमाच्या शाळाचालकांच्या मनमानी या सर्व मुद्दे जनतेमधे घेवुन जावे लागतील.
माझ्या मनात काही आराखडा आहे, बघु या कशी गती मिळते.
तुम्ही एक मोठे पुण्यकृत्य केले आहे हे निसशंय. परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या मुलीला उत्तरोत्तर यश देवो हीच प्रार्थना.
आपला,

द्वारकानाथ.