हा लेख खूप चांगला आहे.
विचार करायला लावणारा आहे.
काही गोष्टी बदलत चालल्या आहेत असे वाटते. उदा. पाहुण्यांचे आदरातिथ्य.
पण एकंदरीत असुरक्षिततेची भावना बऱ्याच प्रमाणात कायम आहे.
आर्थिक स्थैर्याबद्दलची कल्पना ही तशीच आहे.
परप्रांतियाच्या मोठ्या प्रमाणातील वास्तव्यामुळे आक्रमकपणा वाढत चालला आहे.
पण आपला समाज निषेध व्यक्त करण्यापलिकडे फार काही करताना दिसत नाही. एकंदरीत समाजात उदासीनता व मरगळ जाणवते. व दुसरा काहीतरी करेल ह्याची वाट बघत आपण सर्व आळसावलेलो आहोत.
कोळी, ब्राह्मण, मराठा, आगरी अशा सर्वच जाती आत्मकेंद्रित होत आहेत असे वाटते.
मासे विकणाऱ्या कोळणी विरुद्ध भय्ये, सहकार क्षेत्रातील अनागोंदी कारभार, ब्राह्मणांचे राजकारणापासूनचे पलायन, परप्रांतियांची कोकणातली घुसखोरी, सांस्कृतिक पुणे शहराचे हरवत चाललेले मराठीपण अशा अनेक गोष्टींबद्दल आपण फक्त दुसऱ्यांना दोष देवून मोकळे होतो. आपले काय चुकत आहे त्याचा शोध घेत नाही. किंवा संपूर्ण मराठी समाजावर प्रभाव पाडणारे नेते आज दिसत नाहीत. दिसतात ते आघाड्या सांभाळणारे नेते. ज्यामुळे आपलेच नुकसान होत आहे.