भिरंभिरं फारच छान. त्यातल्या विनोदी छटा खासच. धन्यवाद.

वडील जेवताना गंभीरपणे म्हणाले, "आता तुला हातपाय हलवायला पाहिजेत! माझी सर्व्हिस संपत आली." त्या दिवशी मी खूप लांब फिरायला गेलो.

हाहाहाहा.

चित्तरंजन

एक आठवण

आम्ही दोघे मित्र बऱ्याच उशीरापर्यंत  चहावर चहा घेत स्टेशनवरच्या टपरीवर गप्पा हाणत बसायचो. एक दिवस त्याला काय झाले कोण जाणे. तो अचानक उठला आणि म्हणाला, 'हे बदलायलाच हवं. आता जागरणं बंदं. असेच वागत राहिलो बाबा ******वर लाथा मारून घरातून हाकलून देतील. चल मी निघतो.'

मी बकलो, 'अरे वा! या वयातही  लाथा मारू शकतात म्हणजे काका चांगलेच फिट आहेत. चल निघूच.'