मागील गझलेनंतर अपेक्षा वाढल्या होत्या. पण ही गझल ठीकठीक. ओघवतेपणा कमीच.
--- प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभाऱ. (तुमचा) अपेक्षाभंग झाल्याबद्दल क्षमस्व.
तुमच्या सूचनांचा नीट विचार केल्यानंतर मला ज़े वाटले/वाटते आहे, ते पुढीलप्रमाणे. चूभूद्याघ्या -
नव्या जीवनाची निशा जागवू दे ही ओळ वरच्या ओळीला नीट झेलत नाही. 'जीवनाची निशा' थोडीशी भरतीची वाटते. नव्याने सखे ही निशा जागवू दे वगैरे अधिक बरी झाली असती.
--- तुम्ही सुचवलेल्या ओळीत (विवाहोत्तर) नवीन जीवनाची (पहिली,खास) रात्र मुळीच प्रतिबिंबित होत नाही. मात्र नव्या जीवनाच्या निशेतून ती प्रतीत होते आहे. त्यामुळे नव्या जीवनाची निशा मला लिहितानाही अजिबात भरतीची वाटली नाही.
ओघवतेपणा कसा नाही ह्याचे उदाहरण.
तुझ्या संगतीने किती रंगते मी असा शब्दक्रम अधिक प्रवाही वाटतो.
--- ह्म्म ह्म्म. पण तुम्ही सुचवताय त्या ओळीचा अर्थ तुझ्या संगतीमुळे मी रंगते आहे असा होतोय, ज़ो ढोबळपणे अपेक्षित अर्थाशी ज़ुळतो (ऑन मोअर ऍबस्ट्रॅक्ट लेवल ऑफ़ मीनिंग/जनरलायझेशन)पण माझ्या ओळीनुसार तो तुझ्या संगतीत असताना व्यतीत केलेले खास क्षण, ज़ोडल्या गेलेल्या विशेष आठवणी इ. मधील खासियत, विशेषता दर्शवतो आहे असे मला वाटते (स्पेशलायझेशन). गेयतेच्या दृष्टीनेही ही ओळ गुणगुणताना बाधा येत असल्याचे/वाचताना अडखळायला झाल्याचे/ कानांना काही खटकल्याचे/अगोड लागल्याचे ज़ाणवत नाही. त्यामुळे ती ओळ नक्कीच प्रवाही/ओघवती आहे, असे मला वाटते.
खालची ओळ काही खास नाही.
--- तुझ्या संगतीत असताना तर मी रंगतेच रे! तुला कळते की नाही ठाऊक नाही. म्हणूनच आज़ पुन्हा तुला रंगून दाखवायचे आहे. मात्र नेहमीसारखे नाही, तर 'वेगळ्या' मार्गाने. हे लक्षात घेतले तर ही ओळ तर नक्कीच खास आहे असे मला वाटते.
गळाभेट घेते तुझ्या लोचनांची
मिठीनेच त्यांच्या मला लाज़वू दे
ह्या ओळींत लाजवू दे म्हटले तर मिठीनेच त्यांना मला लाजवू दे असे हवे असे वाटते. अन्यथा मला लाजू दे योग्य.
--- "अमु अमुक ने (असे/तसे करून) मला लाज़वले" असे आपण म्हणत नाही का? मी आज़वर असे ऐकले आहे. क्वचित प्रसंगी बोललोही असेन. हेच मुळात (भाषिकदृष्ट्या) अयोग्य असेल तर तुमचा मुद्दा पूर्ण मान्य करायला हवा. अन्यथा माझी ओळ अयोग्य वाटत नाही. सख्याच्या डोळ्यांतील भावनांनी मला लाज़वले => लाज़वू दे
विचारगुरुत्त्वाचा मुद्दा पूर्ण डोक्यावरून गेला. कृपया अधिक स्पष्ट करून समज़ावाल का?