तुम्हा लोकांच्या प्रतिसादांबद्दल आभार!  तात्या, तुमची समज बिलो ऍव्हरेज अजिबात नाही हं.  पण होतं असं कधी कधी ...... प्रत्येकवेळी लिहिणाऱ्याच्या मनातल्या भावना वाचकांपर्यंत पोचत नाहीत.  पण ती चूक माझ्यामते नक्कीच लिहिणाऱ्याचीच.

आता खरं म्हणजे शीला, चक्रपाणि ह्यांनी थोडा वेगळा अर्थ घेतलाय.  मी कविता लिहिली ती एका विरहाची.  म्हणजे रात्री तिचा साजण घरी आलेलाच नाहीये.  म्हणून ती त्याची वाट बघतेय.  रात्री तो तिच्या स्वप्नात आला होता आणि त्यात तो तिला थकवून गेलाय. म्हणून
फुलाफुलात पेंगते
रात्र अजून कालची
स्वप्नातून थकलेली
गात्रं अजून कालची

आता पहाटे ती बाहेर आलीये.   रात्रीच्या स्वप्नातल्या "त्या" धुंदीची नशा अजूनही डोळ्यात घेऊन.
दवात न्हाऊनी पहाट
गोड गोड लाजते
मनातली तुझी नशा
नसानसात उतरते

म्हणून तिची आर्जवं सुरु आहेत की 'अरे राजा, आता तरी ये रे.........इतकी प्रसन्न सकाळ झालीये.........'
पाहतोस अंत का
आर्जवे करु किती
प्रसन्न ह्या सकाळची
वाट पाहणे किती....!

माझ्या मनात कविता लिहिताना असे भाव होते.  आता ह्या स्पष्टीकरणामुळे रसभंग झाला असेल तरी काही इलाज नाही.  मला असं वाटतं काहीही वाचताना वाचकाची एक मनःस्थिती असते......म्हणजे त्या मूडमधेच तो वाचतो आणि त्यामुळे कधी कधी त्या मनःस्थितीवर अवलंबून त्याची reaction असते.  स्वतःच्या कवितेचं वेगवेगळं interpretation वाचायला कुणालाही आवडेलच.  आता बघूया कोणाला आवडते का ही कविता?