नमस्कार यज्ञकर्मी,
आपली पाककृती पाहून तोंडाला पाणी सुटते आहे.
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ह्या भावनेतून आपण 'यज्ञकर्मी' झालेले दिसताय!
आम्ही एकदा वरील प्रमाणे कृती आचरून बटाटेवडे करायचा प्रयत्न केला होता. परंतु गोळे तळणीच्या तेलात सोडल्यावर ते कढईच्या तळाला चिकटू लागले. असे का होत असावे बरे?
- तेल कमी झाले होते
- डाळीच्या पिठातच दोष होता
- पीठ भिजवण्यात चूक झाली होती
- कढई छोटी होती
- की आणखी काही?
आपला
(अपयशी) प्रवासी