मि ही बरेच दिवस ति चर्चा वाचतो आहे.  मुळ विषया पासुन ति लांब लांब जात चालली आहे.

मुळात संगीत किंवा कलेच्या इतर कोणत्याही क्षेत्रात रसिकांनी कलेची आराधना ही स्वतःचा आनंद म्हणून - स्वान्तसुखाय अशी करावयाची असते.
हे तुमचं म्हणणं काही अंशी खर आहे, पण आपली कला दुसऱ्याला दाखवण्याची ओढ ही अनिवार्य असते. समजा लोकांनी आपल्या कलेला चांगल म्हणलं तर कलाकराला आपल्या श्रमाचं सर्थक झाल्या सारख वाटत. पण, हळू हळू ह्या कलेतलं 'मलाच फक्त कळतं' असं वाटायला लागणं व 'आपण दाखवु ति कला' असं वाटणं हीच 'अहं' ची सुरुवात आहे व इथेच माणूस स्वतःला कले पेक्षा मोठा समजायला लागतो.

"मी म्हणतो तेच खरे" ही अलवचिकता खरेतर कोणत्याही क्षेत्रात वाईटच.
सहमत.

"अमूक माझ्या घरी पाणी भरतो" अशी दर्पोक्ती सुरु होते.
स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना असल्या व त्याच्या जोडीला अहं असला की अशी विधानं सुचतात..

राहुल