सद्ध्या रॉबिनची 'फीव्हर' कादंबरी वाचत असल्याने दुसऱ्या बेडकाबद्दल वाचून कॅन्सर रिसर्चर - चार्ल्सची आठवण आली. दुसऱ्या बेडकाप्रमाणे चार्ल्सचेही कष्ट लवकरात लवकर सार्थकी लागून त्याची लाघवी छोटी मुलगी - मिशेल हिचा जीवघेण्या लुकेमियातून जीव वाचावा, ही प्रार्थना. आमेन !

टग्या, आपल्याला या तात्पर्यकथेतून विनोदनिर्मिती करणारी तात्पर्ये अपेक्षित असावी बहुदा ( असे मलातरी वाटले ), पण माझ्या मनात जे विचार आले ते मी लिहिले आहेत. विषयांतर झाले असल्यास क्षमस्व.