प्रवासी,
माझ्यामते कारणे ही असावीत(मी पण २दाच केले आहेत बटाटेवडे. पण ते चांगले झाले होते.)
१. वडा कढईत सोडल्यावर लगेच त्याला झार्याने छेडायची/हलवायची/उलटायची घाई
२. पीठ जास्त पातळ भिजवले.
३. कढईत तेलाची पातळी कमी. (तशी मी पण तेल बचाव धोरणामुळे पातळी कमी ठेवते, पण कढई अवास्तव मोठी नसणे हा कमी तेलात जास्त पातळी गाठायचा उपाय.)
ता.क.- यानंतरचे भाष यांचे स्पष्टीकरण पण समर्पक आहे. परत प्रयोग करावा. आणि परत आपेश आल्यास working conditions नीट नोंदवून ठेवाव्यात म्हणजे आपली सर्वांचीच माहीती पक्की होईल.
आपली(अंदाजपंचे)अनु