कुल,
काल ऑफीसमधलं काम आवरून १० ला रूमवर पोहोचले आणि पटापट सगळं आवरून 'काहीतरी झकास असू दे' अशी प्रार्थना करत हॉस्टेलमेसच्या रांगेत ( बुफे पद्धत आहे ) उभी राहिले आणि पाय उंच करून भाजी कसली आहे बघितलं तर कारल्याची होती.. तीही टॉमेटो, कांदा घालून केलेली !!! इतकीऽऽऽ कडू होती की विचारता सोय नाही. लोणचं घ्यावं त्या ढंगात घेतलेली असूनही तेवढीही खाणं जीवावर आलं होतं, पण सगळी एकदम तोंडात कोंबून पाणी पिऊन टाकलं. मग पोळी कुस्करून त्यात भात आणि आमटी घालून मीठमिरचीसोबत खाल्ली.. नविन मेस शोधायला जायला सद्ध्या वेळच होत नाहीये. म्हणून कधीमधी ( की बऱ्याचदा? ! ) कोपऱ्यावरच्या रपॅपापुवाल्या भैयाकडे वर्णी लावावी लागते. :-(
धावतं अनुभवकथन खूपच नेमकं आणि सुंदर झालं आहे. आजवरच्या सगळ्या मेस - संबंधित मेसवाल्या काकू आणि त्यांच्या कुटुंबासोबत डोळ्यासमोर तरळून गेल्या. खूपच वास्तवदर्शी वर्णन. पुढील लिखाणाला शुभेच्छा.