" आय ऍम डॉ. सो ऍन्ड सो, ऍन्ड आय ऍम अ प्रोफेसर ऑफ फिजिक्स" यावर "आय ऍम अल्बर्ट आईन्स्टाईन, ऍन्ड आय ऍम अ स्टुडन्ट ऑफ फिजिक्स" हे उत्तरही आठवते!

इथे एक प्रसंग आठवतो. पुणे विद्यापीठात एम. एस‌सी. करत असताना आम्हाला खगोलभौतिकी शिकवण्यासाठी डॉ. जयंत नारळीकर होते. एकदा आम्ही काही शंका विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. खोलीमधे एकच खुर्ची होती आणि ते बसलेले होते. आम्ही आत येताच ते उठून उभे राहीले. आमचे शंकानिरसन जवळजवळ १० मिनिटे चालले आणि हा सर्व वेळ ते उभे होते.  विद्या विनयेन शोभते याचा हा प्रत्यक्ष अनुभव मी कदापि विसरणे शक्य नाही.

हॅम्लेट