या लिखाणाने कॉलेजच्या, होस्टेलच्या, मेसच्या आठवणी ताज्या होऊन घायाळ झालो.
'फीस्ट' नावाची फसवाफसवी, फीस्टला 'शिरा-पुरी' हा 'बेत' असला की पडणारे खाडे, वांग्याची भाजी या नावाचा भयाण चिखलसदृश पदार्थ,वांगे, दोडका, पडवळ, भोपळा, तोंडले, कारले हे षड्रिपू, कोणत्याही भाजीत बटाटा मिसळण्याचे असामान्य कसब असलेला तो कळकटशिरोमणी आचारी,  श्रीखंडातली साखर तळाला राहून वरती नुसतेच फसफसलेले पिवळे दही राहिले की ते एकजीव करण्यासाठी दोन्ही हात दंडांच्या वरपर्यंत त्यात बुडवून ते ढवळताना त्याला पाहून पोटात ढवळून येणे, 'होस्टेल डे' च्या शाही खान्यात झालेला वर्गभगिनींचा( शेवटपर्यंत भगिनीच राहिल्या बिचाऱ्या!) लाडीक आग्रह, त्यांच्यावर 'इम्प' मारण्यासाठी इर्षेने खाल्लेले गुलाबजाम, आणि मग रात्री साडेतीन वाजता जोरदार...
असो.गेले ते दिवस!
दोन भिकारी किंवा दोन संगणक अभियंते समोरासमोर भेटल्यावर एकच प्रश्न करतात "कुठल्या platform वर काम करतोस"
हे मला नवीन आहे. भलतेच आवडले.
वेदश्री रपॅपापु म्हणजे काय?