मिलिंद, हा उपाय नक्की कशावरचा आहे. केवळ आंतरजातीय लग्न केल्याने जात मोडते का? यातुन फ़क्त एका जातीची मुलगी अन्य जातीत जाईल इतकेच. परंतु ती ज्या घरात जाते तेथील जातीनिष्ठ कुळधर्म तिला पाळावे लागत असतील तर या आंतरजातीय विवाहाने काय साधते? ती ज्या घरी जाते तिथे असे जातिविशेष काही नसेल तर मग लग्न सजातीय असो वा आंतरजातीय असो, काय फ़रक पडतो? थोडक्यात आंतरजातीय लग्नाचा आणि जातिव्यवस्था मोडण्याचा काही संबंध नाही.
मी आंतरजातीय विवाहाचा समर्थकही नाही वा विरोधकही. लग्न करताना माणसे जोडीदाराची साथ किती चांगली वा योग्य ठरेल हे पाहतात, जात नव्हे. एकदा मने आणि मते जुळल्यावर जात जुळते की नाही हे दुय्यम असते. पण जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाहाचा हा अट्टाहास दुराग्रही नव्हे का?