अहो ते साहजिकच आहे, पण एक लक्षात ठेवा की आई-वडिलांचा विरोध हा एक पिढी मागचा आहे. तो न जुमानता नव्या पिढीने आपल्या मार्गाने जावे. त्यांची सहमतीही हवी हा आग्रह कशाला?

हे खरे की मोठ्या शहराबाहेर अजूनही आई-वडिलांचा निर्णय महत्वाचा असतो. पण त्याचबरोबर तिथे वराकडील मंडळीही तितकीच (जातिबद्दल) दुराग्रही असण्याची शक्यता अधिक. मग अशा विवाहाने मुलीला सुखी आयुष्याची शक्यता किती? का तुम्हाला असे म्हणायचे आहे की तिने पतीच्या जातीचे कुळाचार अनुसरावेत? मग पुन्हा जातिव्यवस्था कायमच राहते की.