अमितराव,
तुम्ही पेरेलमन नामक माणसाचे 'फ़िजिक्स फ़ॉर एंटरटेनमेंट' वाचलेले दिसतेय... पूर्वी (सोविएत संघ अस्तित्वात असताना) सोविएत पुस्तकांच्या दुकानात अत्यंत कमी किमतीत (भाग १ आणि २, प्रत्येकी ५ रुपये) विकत मिळायचे.
यात आर्किमिडीजचे तत्त्व छानपैकी वापरले आहे. (हवेचे कापसावरील आणि लोखंडावरील उर्ध्वसरण, एक किलो कापूस आणि एक किलो लोखंड यांची भिन्न आकारमाने लक्षात घेता या उर्ध्वसरणीय शक्तींची तुलना, आणि वजनकाटा हे उर्ध्वसरण लक्षात घेत नाही म्हणून त्यासाठी compensation वगैरे लक्षात घेता, [वातावरणात तोललेल्या] एक किलो कापसाचे प्रत्यक्ष [वातावरणीय उर्ध्वसरण विचारात न घेता] वजन एक किलो लोखंडापेक्षा अधिक भरावे.)
- टग्या.