सुंदर, वास्तवदर्शी वर्णन!

आज जसे दोन भिकारी किंवा दोन संगणक अभियंते समोरासमोर भेटल्यावर एकच प्रश्न करतात "कुठल्या platform वर काम करतोस"

त्याच जातीतला असल्याने विशेष आवडले! :-)

आणि त्यातच नविन नविन एकमेकांना जेवतांना डोळे भरुन पाहणे हा त्यांचा आवडता छंद असे.

ईईईईईईईक्स! :-)

बाकी 'मेस मधे ताटात पडेल ते खावं लागेल तेंव्हा कळेल' हे मात्र खरे. बटाटा आणि राजमा या दोन पदार्थांबद्दल मेसने निर्माण केलेली घृणा/तिडीक जायला बरीच वर्षे लागली. अळीसकट वाटाण्याची भाजी पुढ्यात वाढून आलेली वीस वर्षांनंतरसुद्धा चांगलीच स्मरते.

अर्थात कँपसबाहेरची परिस्थितीही याहून फार चांगली होती, अशातला भाग नाही. म्हणजे, पदार्थांची चव निश्चित अधिक चांगली असे, पण एकदा मॅगीची ऑर्डर पुढ्यात आल्याआल्या आजूबाजूला घोंगावणाऱ्या असंख्य माश्यांपैकी एकीने (माझ्या डोळ्यांदेखत) माझ्याच मॅगीत आत्महत्या केली असता, त्याबद्दल दुकानदाराकडे तक्रार करता त्याने शांतचित्ताने आपल्या कळकट हाताने ती माशी उचलून फेकून देऊन तीच प्लेट मला परत देऊ केली होती, आणि वर 'माशी काय मी घातली होती का' हेही सुनावले होते, आणि खिशातल्या मर्यादित पैशांचा विचार करता झक मारत* मी ती खाल्लीही होती, हा माझ्या आयुष्यातला मोहक प्रसंग केवळ अविस्मरणीय आहे. माशीने मॅगीची लज्जत (आणि कदाचित माणसाची रोगप्रतिकारक शक्तीही) वाढते, हे मी या प्रसंगातून त्या दिवशी शिकलो.

वसतिगृहावर राहून, मेसमध्ये खाऊन माणूस वाटेल त्याला तोंड द्यायला (श्लेष अभिप्रेत) तयार होतो, हेच खरे!

- टग्या.

*या शब्दाच्या वापराने संस्कृती बुडत नाही, याची शहानिशा करूनच हा शब्द वापरला आहे. तसेही 'झक' या शब्दाचा मूळ अर्थ 'माशी' असा आहे, हे लक्षात घेता, हा शब्द या संदर्भात अतिशय समर्पक ठरावा.