छान लिहिले आहे. पूर्वीचे दिवस आठवले.
सुरूवातीला हॉस्टेल मेस न आवडल्याने, काही दिवस आम्ही बाहेरच्या मेस लावल्या होत्या. ताम्हणकर नावाच्या गृहस्थाकडे आम्ही काही दिवस जात होतो. त्याच्याकडे जेवणात तीनच चपात्या मिळायच्या पुढील प्रत्येक चपातीचे ज्यादा पैसे असायचे. ते वाढतानाच म्हणायचे "ही घ्या तुमची पहिली", "तुमच्या दोन झाल्या" वगैरे. कोशिंबिर कोणी दुसऱ्यांदा मागितली की आपल्या अनुनासिक आवाजात "अहो कोंशिबिर अशी भाजीसारखी वाढता येत नाही हो" म्हणायचे. त्यांच्या कंजूसपणाला कंटाळून आम्ही ती मेस सोडली.
बऱ्याच ठिकाणी फिरल्यावर शेवटी "आपली मेस, हॉस्टेल मेस" हेच झाले. हॉस्टेल मेसमध्ये आचारी, वाढपी सगळी पुरूष मंडळी. थट्टा मस्करीला (आणि त्यांच्या थराला) कोणतीच सीमा नाही. "भात किती वाढू?" वगैरे प्रश्नांना अगदी इरसाल उत्तरे मिळायची :)
"हॉस्टेल डे"च्या दिवशी मेसमध्ये मुलींना (मैत्रिणींना) बोलावण्याची परवानगी असे. (अर्थात ज्यांनी बोलावल्यावर मुली येऊ शकतात त्यांच्याबरोबरच मुली असायच्या बाकी बहुसंख्य प्रेक्षक.) त्यादिवशी मेणबत्त्यांच्या प्रकाशात जेवण व्हायचे. वाढपी, आचारीही व्यवस्थित अंघोळ वगैरे करून यायचे.
"बोंबला" यांनी सांगितलेला प्रसंग आमच्या इथेही होत असे.