पदार्थविज्ञानाच्या माझ्या त्रोटक ज्ञानाप्रमाणे वस्तुमान हे कायम राहते, पण आकारमानाबद्दल असा काही नियम वाचल्याचे स्मरत नाही.
दुधाचे आकारमान आणि दूध + वेगळी झालेली मलई यांचे आकारमान (पातळी) हे दुधाची घनता, मलईविरहित दुधाची घनता, मलईची घनता, मलई वेगळी होण्याच्या प्रक्रियेत मलईत मिसळली जाणारी हवा अशा अनेक घटकांवर अवलंबून असावे, अशी माझी एक भाबडी शंका आहे.
तसेही साबणाचे पाणी घुसळल्यास साबणाचे पाणी + फेस यांची पातळी वाढते, असा माझा अनुभव आहे. (गरजूंनी हा प्रयोग घरी करून बघण्यास हरकत नसावी.) साधारणपणे हेच तत्त्व दूध + मलईच्या बाबतीतही कामी येत असावे, अशी माझी धारणा आहे.
अर्थात तज्ज्ञांची मते याहून वेगळे काही दर्शवीत असल्यास त्याविरुद्ध मी काही म्हणू इच्छीत नाही. I bow to superior expertise!
आता यातून हवे ते तात्पर्य काढण्यास माझी काही हरकत नाही.
- टग्या.