सुभाषजी -
आपण सांगितलेल्या अंगाने विचार डोक्यात आलेला नव्हता हे खरेच! धन्यवाद!!
पण आता विचार डोक्यात घोळत आहेत ते असे -
अर्ध्या बादलीत जी दुधाची पातळी होती ती त्यातल्या दूध आणि मलई याच्या मिश्रणाची होती.
मान्य!
बेडकाने प्रयत्न करून जरी दुधापासून मलई वेगळी केली तरी दोन्हींची समाईक पातळी बदलणे शक्य नाही.
हे कसे?
(१) वेगळे झाल्यानंतर द्रव्यविस्थापन वेगळ्या पद्धतीने होणार; त्यामुळे पातळीत नक्कीच फरक पडेल असे वाटते.
(२) तसेच मलईस घनतेमुळे आकार प्राप्त होईल. त्यावर बेडूक तरेल की नाही हा प्रश्न अलाहिदा... तरी शिखर निर्माण होईल; आणि हलका जीव उंची गाठेलच!!
--------------------
आणखी एक असेच लहानपणी भौतिकशास्त्रातील तत्त्व समजून घेताना वाचलेले उदाहरण - नेमके येथे लागू नाही; पण विचारधारा समांतर आहे असे वाटते.
बंदिस्त तळ्यात नाव तरंगत आहे. नावेतील लोखंडी पेट्या पाण्यात टाकल्या तर -
(१) नाव पाण्यात आता अधिक बुडलेली असेल की कमी? हे सोपे आहे!!
(२) तळ्यातील पाण्याची पातळी वाढेल की कमी होईल की तेव्हढीच राहील? हे बादलीतील दुधासारखे आहे!!
--------------------
खुलासा - मला भौतिकशास्त्राची मनापासून आवड आहे; मात्र जाणतेपणा हा काठावरून वावरण्याइतपतच आहे. तेंव्हा हा लहान तोंडी मोठा घास समजून जाणकारांनी प्रकाश टाकावा!