एखादा पदार्थ एखाद्या द्रवात जेव्हा विरघळतो, तेव्हा त्या पदार्थाचे रेणू त्या द्रवाच्या रेणूंमधील पोकळीत सामावले जाऊन, द्रावाचे आकारमान द्रावक आणि द्राव्याच्या सुट्या आकारमानांच्या बेरजेपेक्षा कमी भरते, असे काहीसे वाचल्याचे स्मरते. (शाळा सोडल्याला अगणित वर्षे झाल्याने हे सर्वच द्रावांबाबतीत लागू होते की नाही, आठवत नाही, पण होत असावे, असा अंदाज आहे. यात [जेथे लागू आहे तेथे] आयनीकरणाचाही विचार केलेला नाही, परंतु आयनीकरणामुळे द्राव्य आयनाचा आकार द्राव्य रेणूपेक्षा आणखीही कमी होत असल्याने, जर का आयनीकरणामुळे काही फरक पडणारच असेल, तर तो द्रावाचे आकारमान आणखीही घटवण्यास कारणीभूत ठरावा, अशी शंका आहे.)

त्यामुळे द्रावणाच्या बाबतीत द्रावणाच्या आकारमानापेक्षा द्राव्य आणि द्रावक यांच्या सुट्या आकारमानांची बेरीज अधिक असणे साहजिक आहे, असे वाटते.

अर्थात दूध हे मलईचे दुग्धद्रवातील द्रावण नसून colloidal suspension आहे, आणि colloidal suspensionsना वरील सर्व विवेचन लागू होईल की नाही, हे (ज्युनिअर कॉलेज सोडल्याला य वर्षे झाल्याने) निश्चित आठवत नाही, परंतु सामान्य तर्काने ते लागू व्हावे, असे वाटते. अर्थात यावर तज्ज्ञांची मते अधिक प्रकाश पाडू शकतील.

- टग्या.