रेडिफ़ने सुरू केलेली सेवा ही मुळात वेबदुनिया या देशी संकेतस्थळाकडून भाड्याने/विकत घेतलेली आहे आणि वेबदुनियाने स्वतःच्या epatra.com  या स्थळावरून ती अनेक (सुमारे ५) वर्षांपासून मोफत उपलब्ध करून दिली आहे. आता तीच सेवा indiatimes.com या पोर्टलने पण दिली आहे आणि ती रेडिफ़च्या सेवेपेक्षा बहुविध आहे.

दुसरे म्हणजे या सर्व सेवा या अक्षरचित्रांवर (fonts) आधारलेल्या आहेत.

त्याउलट, सध्याचा चर्चित युनिकोड किवा पूर्वीपासून प्रचलित आस्कीकोड ही संकेतचिन्हे आहेत, fonts नव्हे. त्यामुळे तुम्हाला कोणताही नवीन font install न करता युनिकोडाधारित मज़कूर वाचता येतो.

यामुळे सामान्यीकरण सुलभ होते, अन्यथा प्रत्येक अक्षरचित्राच्या जनकाच्या मर्जीनुसार कळफलक निराळा होतो. (अर्थात तांत्रिकदृष्ट्या युनिकोड अथवा आस्कीमध्येही हे शक्य आहे, परंतु सामान्यतः तसे झालेले नाही.)

अधिक माहितीसाठी www.unicode.org या स्थळाला भेट द्या.

युनिकोड यशस्वीरीत्या आणि सुलभ व सुंदरपणे वापरून तयार केलेल्या देवनागरी लिपीतील sites फारच कमी आहेत. म्हणून मनोगतचे माहात्म्य अधिकच.

आपला,

मराठा