वाचून बरेच वसतिगृहीय नुभव आठवले. तेलाचा तवंग वर असलेल्या रस्साभाज्या(रश्श्यात भाजी शोधता आली तर नशिब, न आल्यास त्याचा फक्त पोळी मऊ करण्यासाठी उपयोग.) पोळ्या कडक आणि पापड चुकीच्या कप्प्यात ठेऊन मऊ झालेला. अशीच एकदा मेसमधील वांग्याची लगदा भाजी पाहून एक मैत्रिण म्हणाली, 'कसं दिसतंय ना? आपल्याकडे पावसाळ्यात त्या गोगलगाई येतात त्या चिरडल्यावर अशाच दिसतात!' तेव्हापासून मेसमध्येच काय, कुठेच मी आजतागायत कापलेल्या फोडींची वांग्याची भाजी खाल्ली नाही. मला आठवतं, परिक्षा संपल्याच्या आनंदाच्या दिवशी काही खास बेत असेल म्हणून उत्साहात मेसमध्ये आलेली माझी मैत्रिण नवलकोल(याला ढेमसे का झेमसे असंपण काहीतरी म्हणतात.) ची भाजी पाहून रडायला लागली होती.
हल्ली कचेरीच्या दुपारच्या जेवणात परिस्थिती बरी आहे. कधीकधी भाजीत केस, काचा आणि लोखंडाचे तुकडे असले तरी खाणेबल प्रकार आहे.