मला असं वाटतं की मामंजी किंवा अशी विनोदी चुटक्यांची सदरं चालवणारे बहुतेक सर्वच लोक हे विनोदी चुटक्यांचे संग्राहक असतात. एकूणच विनोद हे बहुतेक वेळा इकडून तिकडे संक्रमित होत असतात. अनुच्या बाबतीत झालेला प्रकार माझ्याही बाबतीत झाला आहे. मीच good one! must read. म्हणून पाठवलेली मेल फिरून फिरून पुन्हा माझ्याकडे आली. (भर्तृहरीचे 'यां चिंतयामि...' आठवले. (साम्य फक्त परत माझ्याकडे येण्यापुरतेच!)

या संदर्भात माझ्या संग्रहातला एक विनोद किंवा विनोदी व्याख्या आठवली. ती अशीः

एकाच पुस्तकातील काही मजकूर उतरवून आपल्या नावाने प्रसिद्ध केला तर ती कॉपी किंवा चौर्य पण अनेक पुस्तकांतून थोडे थोडे घेऊन, ते एकत्रित करून प्रसिद्ध केले तर ते मूलभूत संशोधन (Fundamental Research)!

मामंजींनी थोडा आळस झटकून 'मूलभूत संशोधन' केले असते तर ही चर्चा करण्याची वेळच कदाचित आली नसती. असो