प्रतिसादांबद्दल धन्यवाद,

खरं सांगतो.. सकाळी मी हे लिहिले आणि दुपारी जेंव्हा परत वाचू लागलो तेंव्हा माझीही 'विसोबा खेचर' यांच्यासारखिच प्रतिक्रिया होती.. "वैताग"! मला लिहिता येते का? लेखनाचे अंग आहे का? वगैरे स्वतःलाच पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे लिहिले.. (आणि आता उत्तर "बहुतेक नाही" हे मिळाले). माझ्या ब्लॉग वर टाकले. तिकडे प्रतिक्रिया लवकर आणि मोठ्या प्रमणात मिळत नाहीत.. म्हणून इकडे पोस्ट केले.. असो.. ज्यांना हे वाचून त्रास झाला त्यांची क्षमा मागतो.. छे बुवा! लेखन फ़ारच कठीण प्रकार दिसतो! ज्यांना हे लिहिलेले आवडले त्यांच्या बद्दल काय बोलणार! असते एकेकाची आवड! मनोगतावर फ़िल्टर लावावा.. म्हणजे माझ्यासारखा एखादा पुन्हा "साहित्य" या विभागात असे काही लिहिणार नाही. माझ्या छोट्याश्या प्रयोगात साथ देउन म्हणजे प्रतिक्रिया देउन सहाय्य केल्याबद्दल धन्यवाद! ....आणि नाही हो माझ्यावर जुदाई वगैरे चा प्रसंग आलेला नाही..