प्रभाकरपंत,
माझ्या आवडीच्या धिरड्यांना इथे प्रस्तुत केलेत त्याबद्दर आभार!
आपली पाककृती वाचून तोंडाला पाणि सुटले, जीभ हातभर बाहेर आली (कशीबशी गुंडाळून ठेवत आहे).
आम्ही पिठांमध्ये ज्वारीचे व गव्हाचे पीठ सुद्धा मिसळतो. तसेच पिठांना भिजवताना त्यात जिरेपुड, थोडे तिखट, मिठ वगैरे मसाला पण मिसळतो. आणखी चांगली चव येते.
मनोगतींनो, तवा गरम झाल्यावर त्याला तेल लावताना सावधान! धोका टाळन्यासाठी हे करून पहा... एक मध्यम-छोटा कांदा बुडाकडून १/३ भाग कापून घ्या व या कापलेल्या कांद्याने तव्याला तेल लावा. हात न जळता तेल लावता येईल आणि चवीमध्ये आणखी लज्जत येईल.
आपला,
(खवय्या) भास्कर