तात्या,
प्रियालीच्या प्रतिसादाचा रोख तुमच्यावर आहे, असे मला वाटत नाही. (कुणावर आहे ते तीच जाणे /त्याच जाणोत!) कारण तसे तर बुवांच्या लिखाणावर मी, सचिन, शशांक या सगळ्यांचे प्रतिसाद आलेत. मग हे तुम्ही स्वतःवर का ओढवून घेताय?
माफ करा तात्या, पण आजकाल तुम्ही जरा जास्तच बचावात्मक (डिफेन्सिव्ह) पवित्रा घेतायसे वाटते. का बरे असे?
बुचकळ्यात पडून,
सन्जोप राव.
असंबध्द ता.क.  काल आलेला एक एसेमेसः

मी रानात, तू वनात
मी वनात, तू झाडात
मी झाडात, तू फांद्यात
मी फांद्यात, तू पानात
मी पानात, तू फुलात
मी फुलात, तू कळ्यात
मी कळ्यात, तू बुचकळ्यात!