मनोगतावर कुठले लेखन प्रकाशित करायचे त्याचे सर्वस्वी अधिकार प्रशासकांना आहेत असा माझा समज आहे. चर्चा सुरु असताना, वाद घालणे, टवाळकी करणे, दुसऱ्यांवर हसणे, उत्स्फुर्त प्रतिक्रिया, निषेध नोंदवणे क्रमप्राप्त आहे, कारण तिथे चर्चेचेच आमंत्रण आहे.

हाच नियम कविता आणि गद्यलेखनाला लागू असावा का? मनोगतावरील एकंदरित लिखाण हे संपादित केलेले नाही. मनोगत या नावाप्रमाणेच प्रत्येकजण आपली सृजनशीलता इथे प्रकाशित करु शकतो. कसल्या प्रकारचे लिखाण बाद होते हे मी इथे प्रत्यक्ष पाहिलेले आहे. वरील लिखाण तसे नाही. आक्षेपार्ह असल्याचेही वाटत नाही. भाषाशुचितेच्या नियमांत बसणारे ही वाटते.

एखाद्याची सृजनशीलता मर्यादीत आहे किंवा माझ्या तोडिची नाही म्हणून त्याला मी हसायला किंवा त्याच्या लेखावर टवाळखोर प्रतिसाद देण्यास मोकळा आहे असा मनोगतींचा ग्रह आहे का? 'लेखन आवडले नाही' किंवा 'सुधारणा करण्यास वाव आहे' किंवा 'असे का लिहिले'? असे विचारुन आपण थांबू शकत नाही का?

याच बरोबर काही गोष्टि लेखक आणि कवियत्रींनीही लक्षात घ्याव्यात असे वाटते. मनोगत ही अनुदिनी नाही. इथे लोक तात्काळ आणि तत्परतेने मत नोंदवण्यास उत्सुक असतात. परंतु येणारा प्रतिसाद आपल्यावर टिका करणारा किंवा नकारात्मक असू शकतो. तो पचवण्याची ताकद आपल्यात आहे का? आपणही कमी पडतो आहोत हे खुल्यामनाने न मानता टिका सहन न झाल्याने राम राम ठोकणारे बरेच जणही आहेत.

निदान स्वतःच्या पदरच लिहिलय ते ही नसे थोडके.

हे प्रतिसाद देणाऱ्यांना उद्देशून नव्हते. सहज लिहिले कारण उचलेगिरी, टवाळकी करण्यापेक्षा बरे. त्या निमित्ताने पुढील वेळेस सुधारणा सहज होईल म्हणून.

----

रावसाहेबांशी जोरदार भांडण करायला आपली हरकत नाही. ते अतिशय खिलाडू वृत्तीचे आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे.