हाही वृत्तांत छान.
बुरख्यावरून आठवले की प्रवासींबाबत मी असेच
काहीसे आधी एका प्रतिसादात बकलो होतो. असो, पंतांना ही अध्यक्षपदाची खुषखबर
द्यायलाच हवी. :)
एकंदर अश्या वृत्तांताचेही आपले स्थान आहे. संकेतस्थळावर वातावरण कसे
घरगुती, खेळीमेळीचे राहते. मग त्या वृत्तांतांचे लेखक संजोप राव असोत वा
चक्रपाणी. अधूनमधून असे वृत्तांत यायला हवेत.
भारावलेल्या लेखणीने खिरून ललितलुलित (हा बोरकरांचा शब्द) लिहून आपला व्यासंग दाखवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा हे बरे.
सारे कसे घरगुती, मध्यमवर्गीय वाटते. सारे जग आटल्यासारखे वाटते. चला आमटी-भात खाण्याची वेळ झाली.
चित्तरंजन