या चर्चेमधून काही गोष्टी शिकलो..

१. 'मनात आलं आणि झरंझरं कागदावर उतरवलं' या पेक्षा लिहिलेले आगोदर तपासून पहावे.. मला मी लिहिलेले नंतर वाचल्यानंतर बर्याच सुधारण्या सुचल्या.. भावनेच्या भरात लिहूनही इतरांना आवडेल असे लिहाणे हे खूप अवघड काम आहे.. भरपूर वाचन, मनन, चिंतन अशी तयारी लागते.... मोठे मोठे लेखक, कवी यांचे लहरीपणाचे, स्फुरण्याचे किस्से ऐकून थक्क व्हायला झाले तरी त्यापाठीमागे फ़ार कष्ट असतात.

२. मी जो प्रश्नचिन्हांचा अति वापर केला आहे तो टाळता आला असता.. पण खरं सांगू.. माझी त्या परिच्छेदामध्ये व्यक्त केलेली भावना कागदावर उतरवताना मला प्रश्नचिन्हांपेक्षा वेगळा मार्ग सुचला नाही.. खरंच मला प्रश्नचिंन्हांकित शब्दांबद्दल "म्हणजे नक्की काय?" असा प्रश्न उपस्थित करायचा होता..

३. कदाचित मी "साहित्य".."विचार".."वाङ्मय" वगैरे मोठ्या मोठ्या विभागांमध्ये उगीचच हे पोस्ट केले.. तेवढ्या लायकीचे नाही ते.... उगीच भावनेच्या भरात जे मनात आले ते लिहिले आणि आता उगीच लिहून इथे पोस्ट केले असे वाटते आहे....

४. "अभ्यासे प्रगट व्हावे.. नाहीतरं झाकोनी असावे.. प्रगट होवूनी नासावे.. हे बरे नव्हे.." याचे भान इथून पुढे राखले पाहिजे मला....

या गोष्टी मला फ़ार शिकवणार्या वाटतात.. म्हणून आपणा सर्वांचा फ़ार आभारी आहे..