एकलव्यांचे उत्तर बरोबरच होते.
माझ्याच आकलनात काहीशी चूक झालेली होती.
ती त्यांनी व्यनितून नजरेस आणून दिलेली आहे.
तेच ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणारे पहिले मनोगती ठरलेले आहेत.
त्यांचे हार्दिक अभिनंदन!
एकलव्य महाशय, आता तुम्ही म्हणता तसे बारा चेंडू असतील तर
हाच शोध शक्य आहे का त्याचाही तपास करून
व्यनितून कळवावा ही नम्र विनंती!
महेश हतोळकर आणि प्रियाली ह्यांनीही उत्तरे पाठविली आहेत.
मात्र दोघांनीही दोषपूर्ण चेंडू हलका असल्याचे गृहित धरले आहे.
वस्तुतः दोषपूर्ण चेंडू हुडकणे आणि तो हलका की जड
हे तीन तुलनांमध्ये निश्चित करणे हीच खरी समस्या आहे.
विश्वमोहिनी ह्यांनी व्यनिद्वारे तराजू कसा आहे? तो वजन सांगतो की केवळ हलके/जड सांगतो? असे विचारले आहे.
सगळ्यांच्यासाठीच हा खुलासा आवश्यक वाटल्याने इथे करत आहे की
तराजू साधा आहे. तो फक्त हलके/जड हेच ठरवू शकतो.