वैभव,
ही गझल कदाचित मोठ्या बहरामुळे 'शब्दाळ' झाली असली तरी यातील 'सोच' मात्र दाद देण्याजोगी आहे!
हजारदा त्या लहान गावासवे बसूनी रडून घेतो
इमारतींच्या मनात भरले असे कसे भाबडेच रस्ते ?
ही ओळ 'आधुनिक' काळातील गझलेची प्रतिनिधी आहे. लोकसंख्या वाढ, शहरीकरण, काँक्रीटची जंगले,समाजात मिसळण्यापेक्षा (रस्ते) स्वतःला (इमारतीत)बंद करून घेण्याची प्रवृत्ती व त्यासाठी आणखी इमारती बांधून रस्ते 'लहान' होत जाणे हे सगळं पाहून 'हजारदा त्या लहान गावासवे बसूनी रडून घेतो' यातील खोल वेदना व्यक्त होते!जियो!
जयन्ता५२
( 'नश्वर' च्या नशेतून अजून बाहेर आलेलो नाही)