मी शेतकरी नाही. पण काही वेळा एखाद्या क्षेत्राशी संबंध नसलेला माणूस त्या क्षेत्रांतील समस्यांविषयी चांगल्या नवीन कल्पना देऊ शकतो कारण त्याच्या मनांत पारम्पारिक कल्पनांची गर्दी नसते.

आपण सुचवलेले उपाय हे मला बालीशपणाचे वाटतात 

बालादपि ग्राह्यं. क्रांतिकारक बदलांची बीजे असलेल्या सृजनशील कल्पना बऱ्याच वेळा अनपेक्षित ठिकाणांहून येतात. स्वप्नरंजन (विशफुल थिंकिंग) हीसुद्धा अशा कल्पना निर्माण करण्याची पद्धत आहे. या कल्पना पुष्कळदा सुरवातीला वेडगळपणाच्या वाटतात. पण त्या प्रत्यक्षांत आणण्याच्या दृष्टीने विचार केल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करणारे शोध लागतात. उदाहरणार्थ, शिवाजीमहाराजांच्या काळांत हवेंत उडणाऱ्या वाहनाची कल्पना मांडणारा वेडाच ठरला असता. आज ती वास्तवता आहे.  

टीप - हा एक क्रिएटिव्ह थिंकिंग चा स्वाध्याय (एक्सरसाइज या अर्थाने) आहे.